STORYMIRROR

Rohit Khamkar

Inspirational Children

4  

Rohit Khamkar

Inspirational Children

फक्त तुझ्यासाठी...

फक्त तुझ्यासाठी...

1 min
355

वाटतं खूप काही आहे, अजून बाकी लिहिण्यासाठी.

आठवण तुझी आली की थांबतो, फक्त तुला पाहण्यासाठी.


कधी लपलो कामी जाताना, तुला अलगद टाळण्यासाठी.

तरी तू तयार असतेस, सतत अशी पळण्यासाठी.

या नात्याला गरज नाही, सगळंच काही कळण्याची.

आठवण तुझी आली की थांबतो, फक्त तुला पाहण्यासाठी


एवढा पळतोय काय कुणा ठाऊक, ते कशासाठी.

सारं सोडून थांबावं वाटतं, फक्त ते तुझ्यासाठी.

सोबत तू असताना, झगडत नाही मी आनंदासाठी.

आठवण तुझी आली की थांबतो, फक्त तुला पाहण्यासाठी.


प्रयत्न असतो सतत, तुझ्या सोबत असण्यासाठी.

काहूर लागे मना सतत डोळ्या तू दिसण्यासाठी.

बस थोडीशी जागा हवी, जवळ बसून हसण्यासाठी.

आठवण तुझी आली की थांबतो, फक्त तुला पाहण्यासाठी.


हल्ली तुझ्यावर चिडतो खोटा, तुलाच आवडण्यासाठी.

बाबा तयार असतो सतत, तुला मग भिन्यासाठी.

तरी लेक माझी कायम तयार, डोळ्यांची आसवं पुसण्यासाठी.

आठवण तुझी आली की थांबतो, फक्त तुला पाहण्यासाठी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational