पाऊलवाट.
पाऊलवाट.
माळावर फिरताना
साथ देणारी,
काट्याकुट्यातुन पण
पुढे नेणारी,
असतेच एक पाऊलवाट.
पाऊलवाट रानातली
पायांनी बनलेली,
कुठे सपाट तर
कुठे गवतावर चिपलेली,
एकाच माणसाला
चालताना पुरणारी,
रानासोबतचं मानसाचं
नातं सांगणारी.
