STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Drama Inspirational Romance

2  

Abasaheb Mhaske

Drama Inspirational Romance

पानगळ होतेय होऊ देत...

पानगळ होतेय होऊ देत...

1 min
2.9K


साधी सरळ असतात माणसं, असाच माझा भास आहे...

मुखवटे अनेक चेहरा एक, असाच इथे रिवाज आहे..

दोष कुणाला कशास देवू  माझे मलाच नडले भाबडेपण..

संत वचने अनं देवाचे देवपणं, आसूरांच्या दरबारी मातीमोल आहे

तोंडी नसेल घास तरीही, मनगटावर माझ्या विश्वास आहे

दोष कुणाला कशास देवू ...

जसा होतो मी, आजही तसाच आहे...

मीच माझा स्वामी, मीच माझा दास आहे...

दोष कुणाला कशास देवू ... मी माझा भाग्यविधाता

नको विचारु गडे, आता तू कसा आहे

व्यर्थ चिंता नकोच नकोच, खोटी सहानुभूतीही नकोच आता...

दोष कुणाला कशास देवू ...

प्रत्येकवेळी भेटेन नव्याने, पुन्हा बहरेन नव्या जोमाने...

निसर्गाने दिलेलं शहाणपणं; आता मजसोबत आहे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama