ऑन लाईन पेमेंट...!!
ऑन लाईन पेमेंट...!!
मुल माझी अती शहाणी
त्यांची असते वेगळीच कहाणी
तहान लागता लागते पाणी
उठत नाहीत आल्याविना आणीबाणी
ऑनलाइनची त्यांना भलती हौस
करत असतात खुर्चीत नुसती मौज
अडाणी आईबाप आम्ही
आम्हाला होतो मग भलता ताप
पेमेंट झाले ऑनलाइन
त्याचे पुरते घातले श्राद्ध क्लीन
रिसीट साठी फिरू लागलो
होऊन पुरता मी भलता लिन
हा काउंटर तो काउंटर
पत्ता काही लागेना
काही केल्या मागमूस
मला काही कोठे गवसेना
चहूकडे फोना फोनी केली
माझी बाबा पूरती जिरली
तेंव्हा कोठे एक वाट गावली
वाटले एकदाची कोंडी फुटली
आता वाट बघतोय मी
त्या येऊ घातलेल्या पावतीची
सजा भोगतोय मी अशी
ऑनलाइन केल्या पेमेंटची....!!!
