STORYMIRROR

Dinesh Kamble

Inspirational

3  

Dinesh Kamble

Inspirational

नवविष्काराची मूर्ती.

नवविष्काराची मूर्ती.

1 min
1.1K


नवविष्काराची मूर्ती.

_______________________

समाजाच्या बंधनाला.

तुला तोडायचे आहे..

मुक्त यातून होऊनी .

नभी उडायचे आहे..


कर घावावर घाव.

नको मानू बये हार ..

घरा बाहेर येण्यास.

ठोठवावे तूच दार ..


रुढी अनैतिक साऱ्या.

कर चूरचूर बये..

झाली सबला आता तु.

नको मजबूर सये..


विचाराचा घाल घाव.

प्रयत्नांच्या छिन्नीवर..

उभारेल तुझी छबी.

बये ग आभाळभर...


तुला घेरणारे हात.

तूच कर ते कलम..

भेगाळल्या जख्मा तुझ्या.

लाव तूच ग मलम..


कुठवर ठेवशिल

आस कुणाच्या येण्याची..

पूर्ण आहे दुनिया ही

बिनकामी ग बेण्याची..


नको घेऊ मागे आता.

टाक पाऊल तु पुढे..

नको भिऊ तु कुणाला.

असो कोणीही तों पुढे..


नवविष्काराची मूर्ती.

तुझी तु कर साकार..

तुझ्या नव्या भविष्याला.

मनाजोगा दे आकार..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational