नो मोअर
नो मोअर
आई बापाची मी
लाडकी माहेरी.
नववधू आज
आलीया सासरी.
अंगाची हळद
हाताची मेहंदी.
गंध दरवळ
टिकलाच नाही.
पाहा हाव किती
पैशाची सासरी.
सून जणू वाटे
एटीएम ऐतीेची.
मागणी सतत
पैशाची वस्तूंची.
आई बाप सारे
सोसती लेकीसाठी.
लागली चटक
दुसऱ्याचे लुटी.
नाती ती नावाला
छळती सासरी.
लालसा वाढली
सैतानाचे डोकी.
विष प्रयोग तो
होतो माझ्यावरी.
आक्रोश करती
आई बाप भाऊ.
नो मोअर जेंव्हा
डॉक्टर सांगती.
