निसर्ग
निसर्ग
ऐसे फुलून आले कांती यौवनी
असे मधु श्रावण मास मोहनी
नाचे निसर्ग सजूनी
मोहरात वाट साजनाची
चातकी डोळ्यांत गंध फुल जणू
दमयंती भासे इंद्रधनू जणू
स्वप्नरंग असे झुळझुळ वाहता
झरे दवाचे गीत फुलते
तव सखी मनाचे किती किती
मग ते पंख पाखरे
गोठा गाय अन ती गुरे वासरे
मंद धुंद मग नाहून निघावे
नित मनी रे निसर्ग बहरावे
