STORYMIRROR

Yogita Takatrao

Inspirational

3  

Yogita Takatrao

Inspirational

निराशा आणि चिंता

निराशा आणि चिंता

1 min
781


निराशा आणि चिंतेला

लगेच कसं जवळ केलंस ?

एवढया लवकर प्रयत्न न करता

सगळंच सोडून कसं दिलंस?


वाटलं होतं लढणार तु

पण पटलचं नाही मला

मिठी मारून बसणं तुझं

उगाचच येणारया त्रासांना

सोडून दे नको ते विचार

जे आहे नैराश्याचे भंडार

होत नाही उपयोग काही

मेंदूला देऊन तणावपूर्ण भार


जे झालं ते नाही बदलणार

कशाला त्याच्या पाठी डोकेफोड

पुढचा काय तो विचार कर

मागच्या गोष्टींच विसर्जन कर


तु जरा तुझे विचारच बदल

त्रास कवटाळणं बंदच कर

चांगल काय आहे तेच बघ

स्वतःला चांगल्या गोष्टींत गुंतव


फिरकू नको देऊ नैराश्याला

नको ती सारखी चिंताग्रस्तता

स्वतः लाच तु हया चक्रातून सोडवं

प्रेम करायला लागशील मग जीवनावर


नको घोळू नावडते विचार

परत परत तेच ते डोक्याला ताप

घे आव्हानं सिध्द कर स्वतः ला

मग रात्र ही अपूर्ण पडेल ध्येयपूर्तीला


आणि एक दिवस जाणवेल तुला

वेळच नाही तुला निराश व्हायला

शोधत राहशिल तु अनेक वाटा

अंतर्बाह्य उजळलेल मन आणि काया


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational