निःस्वार्थ मैत्री
निःस्वार्थ मैत्री
तुला पाहताच तुझ्या मनातले
मला कळावे..
बोलणे जरी झाले नसले तरी
तुला समजून घ्यावे..
मैत्रीत हक्काची जागा अन्
तुला कधीच न विसरावे..
अश्या जीवा पलीकडल्या नात्याने
तुला मला जोडून ठेवावे..
कवितेत तुला सांगणं थोड कठीण आहे
तुझं हक्काचं स्थान नेहमी अढळ आहे..
तुझं आयुष्यात असणं म्हणजे भाग्य आहे
तुझी सोबत नेहमीच ठरलेली आहे..
मैत्रीचा दिवस वार कधीच नसतो
फक्त आयुष्यभर तुझी साथ हवी आहे..
मैत्री ही प्रत्येकाची वेगळी वेगळी असते
त्याचं या नात्याने जगण्याला परिपूर्ण अर्थ आहे..
