नभ निळे निळे झाले
नभ निळे निळे झाले
निळे रान ,निळे भास
मनी संकल्पही निळे
विस्कटलेले जीवन
निळ्या आसमंती खुले
विरहात लाही लाही
स्वप्न रंगे निळे निळे
सांज वात ,ती पिवळी
चांदणे वाटते खरे
काळ गर्भ आता आला
निळी प्रभा पांघरला
प्रेताचा अग्नी पेटला
निळ्या आभाळा भिडला
उमेद ही जगण्याची
निळ्या पाण्याने शमते
पंख फुटता पाखरू
निळ्या आभाळी उडते
पहाटे मोहक दव
प्राशते निळेच पर्ण
शोशिक होतो विरह
स्वप्नच होतसे जीर्ण
वेदना ती जगण्याची
निळ्या नभात विरली
नव दिशेला कळली
नभ निळाईत शिरली
