नारीशक्ती
नारीशक्ती
नारी तु गं कालची जिजाऊ,सावित्री ,अंबा, द्रौपदी ।
भूषविते आज विविध पद प्रतिष्ठित पदोपदी।।
त्याग तुझा नाही गं बसतं कुठल्याही मोजमापात ।
गारद करते सहनशक्ति तुझी जीवनाच्या प्रवासात ।।
हाडामांसाचा तु गं गोळा,त्याज्य, भोगवाद्याचा मळा
दाखविले सामर्थ्य ,रूप विराट नारीचे सोसुनी प्रसूतिच्या कळा ।।
तोंड दाबून बुकक्याचा गं मार आहे जगाचीच रित ।
गीतगुंजन कराया गातेस प्रेम ,ममता,विरहाचे गीत।।
जिव्हाळा गं तुझा पाणी काळजाचं करते ।
मायेची पाखरण तुझीया पदरा खालीच मिळते ।।
वेळ आल्यास दगडाचं काळीज करते
खांद्याला लावुनिया खांदा मोकळे आकाश करते ।।
तुमच्या सपाट पाटीवर सुंदर कविता ती लिहिते
उज्ज्वल भविष्य तुमचे, फक्त तिच्याच् मुळे घडते ।।
सांभाळा भावनांना तिच्या करते उभं आयुष्य ती गोड ।
जीवनसंगिनी बनुन करते उभ्या आयुष्याची घौड़दौड़ ।।
समजन्या व्यथा स्त्रीची जिणं तिचं जगा दिवसं एकचं
तुटतील काळजाचे तार नाही म्हणाल आपसुकचं ।।
