नागपंचमी
नागपंचमी
श्रावण मासात
नागपंचमीचा आला सण
अधिरले मन
माहेरासाठी.....
सण नागपंचमीचा
सया निघाल्या वारुळाला
पूजाया नागोबाला
मनोभावे..........
पंचमी नागाची
दूध ,लाहया ,कानोटे
नेवैद्य भेटे
नागोबास......
जागोजागी बांधले
झाडाला उंच झोपाळे
घेती हिंदोळे
नागपंचमीला.......
नागपंचमीच्या सणा
चला बनूया सर्पमित्र
काढुया चित्र
नागाचे.........
दिसती आसपास
छोट्या,मोठ्या कैक
जाती अनेक
सर्पाच्या......
असा नाग
करी नाश उंदराचा
मित्र शेतकऱ्यांचा
खास.........