STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

3  

Shila Ambhure

Inspirational

मुक्त होऊ द्या मज

मुक्त होऊ द्या मज

1 min
1.0K


उमलायचंय मला

फुलापरी फुलायचं

प्रगतीच्या झुल्यावर

मुक्तपणे झुलायचं।।धृ।।


घालू नका माझ्या पायी

बंधनांची दुष्ट बेडी

व्यक्त होऊ द्या मजला

ठरवू नका ना वेडी

बंद ओठ उघडूनी

मनसोक्त बोलायचं।।१।।


पुसू द्या आसवे जरा

जगाकडे पाहू द्या ना

माझ्यासवे मला माझी

थोडा वेळ राहू द्या ना

मोराच्या पिसाऱ्यापरी

आनंदाने खुलायचं।।२।।


उभी राहू द्या एकटी

देऊ नकाच आधार

जरी पडेन कितींदा

नाही घेणार माघार

कुबड्याविना कोणत्या

सामर्थ्याने चालायचं।।३।।


निसर्गाची निर्मिती मी

नाही उरले मी अबला

पंख लेउनी ज्ञानाचे

झाले निर्भय सबला

पूर्ण करुनी कर्तव्ये

हक्कासाठी लढायचं।।४।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational