STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

मृत्यूचे वरदान

मृत्यूचे वरदान

1 min
302

जुने त्यागुनी देह करीतसे नवे वस्त्र परिधान

आत्म्याला मिळे देह बदलण्या मृत्यूचे वरदान

व्यर्थ शोकास आवरी, नको रडू वेड्यापरी ।।धृ।।


क्षणभंगुर ही सुंदर काया करशील किती प्रेम

नश्वर देह कधी निघून जाईल नाही त्याचा नेम

मातीत जाणाऱ्या देहाचा कशास हा अभिमान ।।१।।


जीव शिवाशी करार करुनी नरजन्मी आला

करार विसरून मोहाच्या बाजारी गुंग झाला

ज्याने दिले हे सर्व तयाचे विसरून गेला भान ।।२।।


इथे राहण्या मिळे भाड्याने हा देहाचा पिंजरा

हित स्वतःचे साधावयाचा विचार व्हावा जरा

वेळ आली करावे खाली भाड्याचे हे मकान ।।३।।


नरजन्माशी आल्यावर जीव कर्माने बांधला

पत्नी, मुले, हा संसाराचा खेळ असे मांडला

विहित कर्म संपताच येथून जीव करी प्रस्थान ।।४।।

अंत नसे मानव जीवनाचा मृत्यू एक विसावा

आत्मा गेल्यावर देहाचा व्यर्थही शोक नसावा

नसे अमंगल मृत्यू, जीवनाचे आहे मंगलगान ।।५।।




साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational