मराठी भाषा दिन
मराठी भाषा दिन
*"म" मराठीचा, माझ्या मराठीचा !*
*कु* - कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, असे मराठी राजभाषेची शान,
*सु*- सुरस, सुंदर सौंदर्याची, बावनकशी तू खाण,
*मा-* मार्दव, शौर्य, साहसाची, सालंकृत तू जान,
*ग्र-* ग्रह तुज विषयी अनेक, तरी तू आहेस प्रतिभासंपन्न
*ज-* जरी समजती मराठीस दीन, परी आम्हा तिचा सार्थ अभिमान
*वि* - वि.वा.च्या प्रतिभेस लाभले मराठी भाषेचेच कोंदण,
*ष्णू-* विष्णुजी सुत आहेत मराठी साहित्याचे सुवर्ण पान,
*वा*- वाढदिवस तयांचा (२७फेब्रुवारी)असे, मराठी भाषेचा गौरव दिन,
*म-* मरता भाषा, देश ही मरतो, म्हणून जपा तिचा अभिमान,
*न-* नखशिखांत सजते नटते, स्वर-व्यनंजनाचा साज शृंगारुन,
*शि-* शिखरावरी वसलेली माझी मराठी भाषा आहे जगन्मान्य,
*र-* रसास्वाद घेण्या तिचा, हवी भाषेची योग्य जाण,
*वा*- वाणी ही भारतात चौथी,व जगात चौदावी असे तिचे स्थान,
*ड*- डर नसे कशाचा तिज,देऊनी झुंज अमृतातही पैजा जिंकेन,
*क*- करुनी सलाम, देऊनी मान, जगभर होतोय तिचा सन्मान,
*र*- रक्षण करुन आपल्या ज्ञानभाषेचे, उंचावू तिचे स्थान !!
