मोगऱ्याचे फूल
मोगऱ्याचे फूल
इवलेसे, सुंदरसे मोगऱ्याचे फूल
सुवासाची त्याच्या पडते भूल...........
मोगऱ्याच्या कळ्या दिसतात कशा
आकाशातून चांदण्या उतरल्या जशा ........
मोगऱ्याच्या कळ्या फुलल्या अशा
स्वर्गातल्या पऱ्या उतरल्या जशा........
हिरव्या हिरव्या पानांत शुभ्र शुभ्र फुले
फुलांच्या सुगंधात आसमंत डूले........
देवाला ही प्रिय मोगऱ्याची फुले
मोगऱ्याच्या फुलासारखी आम्ही सारी मुले.....
