STORYMIRROR

Gaurav Daware

Drama Others

3  

Gaurav Daware

Drama Others

मनग्वाही...

मनग्वाही...

1 min
212

भुकेची कहाणी भुकेने मिटत नाही

मनाची शांतता खरी देते मित्रा ग्वाही

थोडी रिकामी थोडी आहे रे पुण्याई

पण या शिवाय दुसरं सत्य कोणतच नाही


मनाची कठोरता असते ठाई ठाई

अबोल प्रेमावर कोणी फेकते राजा शाई

मनाची कठोरता इथे पुन्हा पुन्हा वाही

पण ही अबोली आता पुन्हा मिळणार नाही


पक्षी आहे दूर याचे पंख देतात ग्वाही

कविता लिहिणारा कवी वाट पाहतोय ठाईठाई

दूर असणाऱ्या चिमणीची लुप्त झाली शाई

लुप्त करणारा माणूसच राक्षसी हैवान होई


शब्द संपले की फुटतात ओळी जणू आहे पुण्याई

दूर जाणाऱ्या गोष्टींची हळूच लपते घेऊन शाई

म्हणून भुकेची कहाणी भुकेने मिटत नाही

मनाची शांतता हीच खरी देते मित्रा ग्वाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama