मला उपरा भेटला
मला उपरा भेटला
अरे ,अरे ,अरे
मी पाहिले छान
सुंदर दृश्य
नि उंच कमान
एक होते जहाज
खूपच मोठे
जमीन आकाशाच्या मध्ये
तरंगताना वाटे
त्यांच्यातून निघाली
वेगळीच किरण
प्रकाशाने त्याच्या
उजळली धरती पूर्ण
ते होते उपग्रह
पाहून आश्चर्य वाटले
जेव्हा त्याच्यातून
उपराने पाऊल टाकले
सोबत जातानी
त्याने मला ही नेले
त्याच्या दुनियेचे
कपडेही दिले
आकाशाची सैर मी
करत होते मजेत
खूपच मज्जा येत होती
त्या नवीन दोस्ता समवेत
