खरे प्रेम
खरे प्रेम
म्हणतात ना लोक
प्रेमात आंधळे होतात
तशीच ही गोष्ट
ज्यात प्रेमात नयन देतात
प्रेम कहानी सजली
कॉलेजच्या तरुण जीवनी
आवडली दोघांनाही
नवजीवनाची नवी कहाणी
पण परिस्थिती मुलीची
थोडी बिकट होती
मुलाच्या घरची मात्र
ख्याती मोठी
थोडीशी होऊन वादावादी
प्रेम पक्षी उडाले पिंजऱ्यासाठी
मुलगा झाला तिथेच स्थिर
मुलींनी करून अभ्यास झाली मोठी
पण पहिले प्रेम
जणू पहिल्या पावसा सारखेच होते
नेहमीच ते हवेसे वाटे
जरि काळाचे फिरले पाते
दुरावा झाला पण प्रेमाचा धागा
खूपच घट्ट बांधला गेला
असाच एक दिवस आला
मुलाचा अपघात झाला
नयन त्याचे गेले अपघातात
डोळ्याला चष्मा हातात काठी
दिसताच तो अशा अवस्थेत
मुलीच्या न शब्द कंठी
प्रेमासाठी ती झाली बावरी
नयन शस्त्रक्रियेसाठी तिने दिले
जग दिसावे त्याला म्हणून
दान नयनाचे तिने केले
हे रहस्य त्याला कळले
त्याच्यासाठी तिने नयन सोडले
प्रेमात किती हे असे हरले
खरेच एकमेकांचे साथी ठरले
