कहाणी राजा राणीची
कहाणी राजा राणीची
1 min
139
सर्वसामान्य माणसांची
ही सामान्य कहाणी
त्यांच्या दुनियेतले दोघेही
ते राजा आणि राणी
अनोळखे दोन व्यक्ती
एका बंधनात बंधले
लग्न कार्यक्रमात त्यांच्या
बंध प्रेमाचे बांधले
त्यांनी थाटले नवगृह
आणि नवा संसार सारा
चढ-उतारात एकमेकांना
दीला प्रेमाचा सहारा
लेकर ही मोठी झालीत
आणि गाठला त्यांनी म्हातारपणाचा टप्पा
जीवनातली सर्वच क्षणी
यांचा प्रवास नव्हता सोपा
वृद्ध अवस्थेतही
प्रेम त्यांचे तसेच आहे
सोबत सोबत आता हे दाम्पत्य
नातवांचा खेळ पाहे
