प्रवास
प्रवास
1 min
60
कट्टी बट्टी थूथूथू
करत करत
झाली दोस्ती सुरू
सुरुवातीला फक्त भांडण
दुष्मण जनू एकमेकांचे
कधीही न जमले एका विषयावर
असे हे दोघेही वेगळ्या विचारांचे
प्रसंगाने मैत्री
झाली शब्दापुरती
तरीही भाषांतरात
ते थोडेसे हरती
वेळेच्या नदीने किनारऱ्याला
नेली त्यांचीही नाव
मैत्रीच्या ओढ्यामध्ये गवसला
त्यांना प्रेमाचा गाव
प्रवास रूसवा फुगवीचा
राग आणि आनंदाचा
झाला सुखकर वेंधळा
प्रवास हा प्रेमाचा
