झाड
झाड
1 min
218
बीज लावता भूईत
अंकुर रुपी प्रगटे
घेता काळजी त्या जीवाची
लेकरा सम ते वाटे
इवलेसे ते रोप
मोठे मोठे होते
वाढण्यासाठी पोषण
त्यास हवे असते
जशी काळजी घेता मुलाची
तशी काळजी जर घेतली
मोठे होऊन देते
फुल फळ आणि सावली
त्याच्या छायेमध्ये
मोठी होते नवपिढी
कित्येकांना सावली देत
उभारे रोज नवी गुढी
प्रकृतीशी समतोल
ठेवते हे झाड
त्याच्यामुळे नेहमीच
होते आनंदात वाढ
