प्रकृती
प्रकृती
1 min
83
हिरवाईने नटलेला निसर्ग
नटलेली सर्व सृष्टी
समतोल राखण्या प्रकृतीचा
हवी असते वर्षा वृष्टी
वृक्षांमुळे पशूपक्ष्यांना
भेटतो निवारा
स्वर्ग सुख भेटते इथे
जेव्हा सोबत असतो निसर्ग सारा
पण वृक्षतोडीने
हे सारे बदलते
रूक्ष असे जीवन जगण्यास
काळ समोर ते मांडते
विस्कळीत होते जीवन साखळी
आणि विस्कळते सर्व जीवन
मनुष्य प्रगतीच्या वाटेवर
नष्ट करतोय हे आनंदवन
मानवा पुढाकार घ्यावा लागेल
वाचवण्यास हे सुंदर जीवन
नाहीतर स्मशान बनेल
हे जिवंत भवन
