तगडे झाले लुकडे
तगडे झाले लुकडे
एकतायेत काहो लुकडे
आम्ही तगडे तुगडे
आहार घेतात कमी
जनू आडनाव तुमची लाकडे
आवडते पदार्थ कधी
सोडत नाही आम्ही
काहीही खाण्याचा निर्णय असो
आम्हीच आमचे स्वामी
पण एकदा वाटले आम्हालाही
एवढे जाडे नको
आपलेही अस्तित्व
इथे का बर वाको
पण सवय मनाला लागली अशी
ती कशीच कमी होईना
किती केले प्रयत्न
पण जिभेवर ताबा राहिना
मग निर्धारच एकदम पक्का केला
सवयिचा ताबा कमी झाला
खूप दिवसांच्या प्रयत्नाने
शरीराला आकार आला
मग स्वतःलाच
म्हणलो आम्ही
काहो तगडे
कसे काय झालात लुकडे कमी
अहो लुकडे नाही
पण तंदुरुस्त झालो आम्ही
अन भेटली सुंदर
निरोगी जीवनाची हमी
