आईचे प्रेम
आईचे प्रेम
सुरुवात करू पाहिली तरी
शब्द पुढे सरकत नाही
म्हणतात ना प्रेमाच्या मंदिरात
आई पेक्षा मोठी मुरत नाही
जीवापाड प्रेम करणारी
असते ती आई
लेकरू कसेही असो
तुलाना मात्र करत नाही
जन्म देते सांभाळ करते
प्रत्येक परिस्थितीत पाठीशी उभी राहते
काळजाच्या तुकड्याला पूर्णपणे ओळखते
ती फक्त असते आई
आई कधीकधी कठोर
पण नेहमीच प्रेमळ असते
खरं सांगू आई तुझ्या अस्तित्वा शिवाय
माझे जीवन स्वप्न सुद्धा नसते
निरागस प्रेमाचा धडा
शिकवते ती आई
बोल बोबडे जरी असले तरी
तिच्यासाठी त्यांचा आनंद ब्रम्हांडात नाही
लेकरू किती जरी झाले मोठे
तरी तिच्यासाठी लेकरूच असते
कारण वय जरी वाढले
तरी प्रेम तेवढेच निरागस असते
