STORYMIRROR

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Inspirational Others

5.0  

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Inspirational Others

मज्जा तर तेंव्हाच यायची

मज्जा तर तेंव्हाच यायची

1 min
579


टिव्हीकडे पाहान्याची जुनी स्टाईल


मज्जा तर तेंव्हाच यायची

जेंव्हा शेजार्याच्या घरी टीव्ही पाहायची

आणी शो जोशमधे आल्यावर लाईट जायची


मज्जा तर तेंव्हाच यायची

जेंव्हा आवडती सिरियल लागायची

आणि म्हातारी चँनल बदलायची


मज्जा तर तेंव्हाच यायची

जेंव्हा शक्तिमान लागायची

आणी

सगळी पोर पाटलाच्या घरी जमायची


मज्जा तर तेंव्हाच यायची

जेंव्हा घरातील मानसे काडुन द्यायची

तरीसुद्धा पुन्हा पुन्हा पोर

जाउन बसायची


मज्जा तर तेंव्हाच यायची

जेंव्हा रामायन सिरियल लागायची

आणि वेटाळातील सगळी महिला मंडळी जमायची


मज्जा तर तेंव्हाच यायची

जंव्हा सिग्नल जायची

आणी

टिनावर जाउन ओरडायची

आल्या मुंग्या गेल्या मुंग्या


मजा तर तेंव्हाच यायची

जेंव्हा नाही काही समजल तरी पोर टक्क लाउन टिव्हीकडे पाहायची

मज्जा तर तेंव्हाच यायची

मज्जा तर तेंव्हाच यायची ........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational