मित्र
मित्र
मित्र
( अभंग रचना )
सुखात दुःखात । राहतो सोबत ।
चिंता ही हरत । तोच मित्र ॥ १ ॥
पुस्तकही असे । मित्र असा खरा ।
वाटे तोच बरा । कधी कधी ॥ २ ॥
बोलतो बोचरे । टोचतोय कान ।
देतो सदा मान । मित्र खरा ॥ ३ ॥
मित्राची सोबत । भास श्रीमंतीचा ।
तेथे दिखाव्याचा । प्रश्न नसे ॥ ४ ॥
किशोर म्हणणे । बंध ते मैत्रिचे ।
जग जिंकण्याचे । ध्येय ठेवू ॥ ५ ॥
