STORYMIRROR

Nalanda Wankhede

Inspirational

3  

Nalanda Wankhede

Inspirational

मी आवाज उठवणार

मी आवाज उठवणार

1 min
641




स्वार्थी ज्वालामुखीच्या मुखावर

बसलोय आपण सर्व

घेऊन हातावर प्राण

कधी होऊल विध्वंस

कसा राखावा जीवाचा मान

माणसं पाहून ज्वालामुखी

रंग बदलतोय,


फितुरी करून दंगली पेटवतोय

निरपराधी जीवांना

कारागृहात डांबतोय

देशद्रोहाचा आरोप मढतोय

मासांची जे निर्यात करतात

व्यवहार कुशल त्याला व्यापारी म्हणतो

गुराख्याला गुरांच्या चोरीच्या आरोपात

जीव गमवावा लागतो


खूप नशीबवान देश आमचा

नशिबी एवढी पेलवत नाही

विकासाच्या पाऊलखुणा शोधता शोधता

पक्की वाट कधी कच्ची झाली

कळलेच नाही

इंधन निर्यात करणारा देश आमचा

इंधना साठी तडफडतो आहे

गॅस सिलेंडर झाले दिवास्वप्न


पारंपरिक चुलीकडे कल ओढत आहे

धुराने आधी भिंतीच काळवंडत होत्या

आता मने ही काळवंडत आहे

चोहीकडे धुरांचे लोटचं लोट

माणुसकीला गालबोट लागले आहे

चौकीदार जेव्हा विश्वासघात करतो

रक्षण मग कोणी करावे

तिजोरीनेच चोरी केली तर मग

आळ कोणावर घेणार


आणि दोष कुणाला देणार

बस्स झालं बुजगावणं

मी आता आवाज उठवणार

खरे खोटे जगाला सांगणार

लपलेलं सत्य बाहेर काढणारं

खोट्याच्या तोंडाला काळे फासणार


मी प्रण केला स्वतः शीच

असत्या समोर नाही झुकणार

मोजावी लागली किंमत तर बेहत्तर

सत्याच्याच पाठीशी राहणार

सत्याच्याच पाठीशी राहणार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational