महात्मा
महात्मा
चालत नाही कलयुगात
नेहमीच महात्मा असून
लोक घेती गैरफायदा
केसांनी गळा कापून
कार्य आपुले करत राहावे
चांगली विचारसरणी सोडू नये
वेळप्रसंगी अन्यायाला मात्र
वाचा फोडायला विसरू नये
साधूसंत,महात्मे यांची
चरित्रं जरूर वाचावी
त्यांची वागणूक नेहमी
ध्यानीमनी ठेवावी