महात्मा गांधी...!
महात्मा गांधी...!
आज पुण्यतिथी आशा महात्म्याची
ज्यांना आम्ही पाहिलं नाही
पण कोणतंही पान त्यांच्याविना
आज पावेतो हालल नाही
बरच पाणी पुला खालून गेलं
काही डोक्यावरून गेलं
काही मनात गेलं
काही हृदयात गेलं
काही अंतःकरणात गेलं
जिथं जिथं गेलं तिथं तिथं
त्यानं वेगळं स्थान निर्माण केलं
स्वच्छ सुंदर निर्मळ अस
मोठ अटळ अढळ भाव विश्व निर्माण केलं
सत्य अहिंसा स्वच्छता सार सार
पूर्ण भारावून टाकणारं
आणि सार जीवन व्यापणारं
अशा महान व्यक्तिमत्वास
पुण्यतिथी निमित्य
मनःपूर्वक भाव पूर्ण
काव्य सुमनांची ही छोटीसी
काव्यांजली....!
महात्मा गांधी अमर रहे...।
