म्हातारपण...!
म्हातारपण...!
तरुणाईत कुठलं आलंय म्हातारपण
म्हणता म्हणता सुरू झालं आजारपण
ओठावरची मिशी रंग बदलू लागली
डोक्यावरची काळी टोपी फाटू लागली
चप्पल आपली पोराला येऊ लागली
पोरीला उगाच काळजी वाटू लागली
बायको हक्काची उण दूण काढू लागली
आप्त मित्र सारे विचारपूस करू लागले
कर्तुत्वाचं मोजमाप होऊ लागले
जमीन जुमला बंगला गाडी
हिशोब नजरेसमोर नाचू लागले
कर्जाचे डोंगर सुद्धा हिणवू लागले
हिरवळ तरुणाईची लुप्त होऊ लागली
आठवण गेल्या काळाची सतावू लागली
इतिहास जमा गोष्टींचा गोषवारा
सहज क्षणात झाला आणि
मी क्षण भर विचार केला
याला कोण म्हातारपण म्हणणार
ही तर झाली जीवनाच्या
घडामोडिंची गोळा बेरीज
आता कळलंं मला जीवन कसं जगायचं
आता मनासारखं खरं जीवन जगायचं
सारं सारं केलं आणि घोडंं मार्गी लागलं
वाटलं आता कोठे मिसरूड मला फुटलं
वेल बिगनिंग इज हाफ डन
हाफ सेंच्युरीच्या टाळ्या कडाडल्या
आणि मोठ्या दिमाखात पुन्हा
विनिंग इनिंन सुरू झाली
म्हातारपण छे... ही तर खरी सुरुवात
जियेंगे तो और भी लढेंगे
मगर जिंदगीको जिंदादिलीसे जियेंगे
हार के जीना जिंदगी नहीं
हे आम्ही चांगलेच जाणतो
म्हणून तर म्हातारपणाला लाथ झाडतो...!!
