STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Inspirational

4  

Sarita Sawant Bhosale

Inspirational

महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

1 min
216

महाराष्ट्र माझा आणि मी महाराष्ट्राची

अभिमान वाटे मला अशी महाराष्ट्र संस्कृती

संस्कृतीला गंध या इतिहासाचा

अपूर्व वारसा लाभला परंपरेचा

शिवाजी महाराजांच्या पोवाड्याचा

संतांच्या अभंगांनी भरलेली

सणासुदिंनी नटलेली, 

हिरवळीचा साज ल्यालेली

लावणीच्या अविष्कारात न्हालेली

विविधरंगी विविधढंगी सजलेली

गोडव्याचा,चैतन्याचा,उत्साहाचा

रंग उधळणारी अभूतपूर्व अशी

माझी महाराष्ट्र संस्कृती

महाराष्ट्र माझा आणि मी महाराष्ट्राची

अभिमान वाटे मला अशी महाराष्ट्र संस्कृती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational