महागौरी
महागौरी
आश्विन शुद्ध अष्टमीला
असे मान तुझाच महागौरी
गौरवर्णी अंगकांति देवीची
श्वेतवस्त्र परिधान करी ||१||
आठवे रुप नवदुर्गेचे
विद्वत्तेचे,निरागसतेचे
प्रचंड शक्तीची देवता
महागौरी नाम देवीचे ||२||
पुराणे वर्णिला महिमा
कठोर तपश्चर्या केली
गंगेत स्नान घालिता
कांती तुझी गौर झाली ||३||
चारभुजा धारी देवी
वृषभ हे वाहन असे
सोन्यासारखी तेजस्विनी
शंख, चक्र समान दिसे ||४||
पावित्र्य, शुद्धतेचे प्रतिक
पूर्वसंचित पापहारिणी
शांत स्वभावाची देवी
असे अमोघ फलदायिनी ||५||
पूजा, स्मरण करता देवीचे
सिद्धी अलौकिक प्राप्त होई
अशक्य ते शक्य करिती देवी
आशीष सुख, समृद्धीचा देई ||६||