STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Inspirational

0.8  

Sheshrao Yelekar

Inspirational

मेघदूत

मेघदूत

1 min
1.7K


विरहाच्या कठीण यातना, दूर परदेश

जा रे जा रे मेघदूत, घेऊन संदेश।।धृ।।


आसवांना वाट मोकळी, हृदय खोदले।

आठवणींच्या सागरात मन कोंबले।।

दोन जीवाच्या प्रेमाला,समाजाचा उपहास।

जा रे जा रे मेघदूत,घेऊन संदेश।।


विरहाची आग मोठी,होरपळला जीव।

प्रेमाला दूर करणारी, कसली नीव।।

जीवलगा दूर असा तू प्रेमाचा परिहास।

जा रे जा रे मेघदूत, घेऊन संदेश।।


विरहाच्या कोंदणाने,स्वास घाबरले।

एकदा भेट व्हावी म्हणून मन सावरले।।

अश्रू धाराने व्यापला, संपूर्ण आकाश।

जा रे जा रे मेघदूत, घेऊन संदेश।।


चातकाची सवय घरुन,लावले डोळे।

प्रेम प्यासा याचक,आसावलेले गोळे।।

प्रेमाची ढाल उभी धरुन उभा सावकाश।

जा रे जा रे मेघदूत, घेऊन संदेश।।


भेटून एकदा व्हावं जीवनाचा सोनं।

अळथळ्यातून वाट काढ, तोडून मौन।।

येवून जा या पामराला लागावा परीस।

जा रे जा रे मेघदूत, घेऊन संदेश।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational