मौन
मौन
बाळगतो मी मौन
स्वतः स निराखन्यासाठी
शांत वाटेवर चालत चालत
बर्याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी...
बाळगतो मी मौन
घडलेल्या चुकांना
गवसणी घालण्यासाठी
बर्याच गोष्टींच्या
तळापर्यंत पोहोचण्यासाठी....
बाळगतो मी मौन
गर्दीत माणसांच्या
माणुसकी शोधण्यासाठी
विखुरलेल्या आयुष्याचे
ध्येय गाठण्यासाठी.....
