STORYMIRROR

Renu Pillay

Drama

3  

Renu Pillay

Drama

मैत्री

मैत्री

1 min
139

मैत्री असावी तर फुलपाकरा सारखी असावी,फिरणारी, नाचवणारी,खेळवणारी, हसवणारा असावी.

दुःखाच्या समुद्रात आदार देणारी असावी,

सुखाच्या सरीत आनंदात वाहणारी असावी.

मैत्री असावी तर प्रेमाच्या सरीत असावी,

रागाच्या डोंगरात कधी न जावी,

हातात हात पकडून कधी न सुटावी

मैत्री कायम अशीच गोड असावी.

हसत खेळत कायम ती जपावी.

एकाशी केलीत तरी ती घट्ट करावी...

कधी न तुटेल अशी जपावी,

शंभर जणांशी जरी केलीत तरी निभावण्याची मात्र जिद्द ठेवावी...गोड ही मैत्री नेहमी जपावी

सोबत आपल्या कायम हृदयात ठेवावी.

मैत्री असावी तर प्रेमळ असावी,

राग आणि द्वेष न ठेवता करावी,

मैत्रीची कायम सोबत असावी.

राग आणि द्वेष सर्वे बाजूला सारून,

सर्वे गोड क्षण अगदी काळजात मुरावे

मैत्री असते नाजुक धागा...कधी न तुटो असे अलगद जपावे

कायम आपल्या हृदयात कोरून ठेवावी

मैत्री असावी तर अशीच असावी...

सोबत आपल्या कायम जपून ठेवावी

जीव घेणारी नव्हे तर जीव देणारी असावी...

दूर गेलो तरी आठवण ठेववावी...

मैत्री ची ओढ मनात सारावी

मैत्री हवी तर अशीच असावी

सोबत आपल्या कायम जपून ठेवावी.

मैत्री असावी तर जय-वीरू सारखी असावी

जीवाला जीव देणारी असावी...एकमेकांनवर जीव लावणारी असावी

दोन शब्द गोड बोला...मैत्री मध्ये मिठास ठेवा

प्रेमाचा द्यास ठेवा...मैत्रीची एक आस ठेवा.

माझी कविता मनात ठेवा...मैत्री कायम काळजात ठेवा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama