STORYMIRROR

Renu Pillay

Others

3  

Renu Pillay

Others

कृष्णा यमुना काठी

कृष्णा यमुना काठी

1 min
134

कान्हा तुझ्यात वाहिले तुझ्या बासरी धुंदीत

तुझ्या मोहक रूपात,

तुझ्या डोळ्यात पाहिले सारे जग सामावले...

तू रात्रीचा चंद्र,पहाटे सुर्याचे प्रकाश

तू हिरवेगार निसर्ग, तू फुलांच्या पाकळीत

तू अलगद नाचलास

मोरपीसाच्या रूपांत

दही भाताच्या शितेत कधी दुधाच्या रुपेत

तुझे रूप पाहिले मी जगा जगाच्या निसर्गात.

कान्हा तुझे डोळे काही से बोलले

तुझे मुख ही हसले

तुझे बासरी वाजली

तुझे चाहूल लागली.

गाई गोट्या च्या रूपात

तुझे मुख ही आम्हा दिसले

तुझे बासरी ची धून

कानास स्पर्श केले.

तू पावसाच्या थेंबात...तू वाऱ्याच्या हवेत

तू उनच्या प्रकाशात...तू आहे निसर्गात.

तू हृदयाच्या ठोक्यात

तू मनाच्या श्वासात

तू पान्याच्या वेलीत

तू मायेच्या छायेत

तुझे काही अंत नाही

तू आहेस चरा चरात..



साहित्याला गुण द्या
लॉग इन