STORYMIRROR

Renu Pillay

Romance

3  

Renu Pillay

Romance

वाटेवरी मोगरा

वाटेवरी मोगरा

1 min
299

सायंकाळी वाटे वरती, तिची मला आठवण आली।

सुंदर तीचं रूप... मला पाहण्याची तीव्र इच्छा झाली।

पूढ़े टाकावे पाऊल, मला मोगर्याची हाक ऐकू आली।

तिचं सुंदर रूप पाहण्याची मोगर्याला देखील इच्छा झाली।

वाटे वरती चालताना, मोगर्याने माझी साथ दिली।


तिच्या काळ्या लांब केसांची मोगर्यास देखील आस लागली।

तिच्या काळ्या भोवर्यांच्या डोळ्यात वाहण्यास मनापासून साद घातली।


आली ती अशी समोर माझ्या...कावेरी सागरात झालो मी तिचा...

स्वप्नात रंगलो, तीच्यातच गुंतलो...कावेरी सागरात झालो मी तिचा...

मौन शब्दात जणू ती खूप काही बोलुन गेली।


माझ्या कडे पाहिले तेव्हा माझ्याकडेच पाहत राहिली,

नंतर, आणखी खुलले तिचं रूप, जेव्हा पहावे तिने मोगरा...

आनंदाने पाणावली, पण चेहरा ठेवून हसरा।


इशारे करते, ती हाताचे, पलटून मागे वळूनी।

माळावा मोगरा कैसात धनी, आपलं मानुनी...

माळावा मोगरा कैसात धनी, आपलं मानुनी।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance