STORYMIRROR

Renu Pillay

Romance

3  

Renu Pillay

Romance

सांगायचे आहे तुला

सांगायचे आहे तुला

1 min
322

सांगायचे आहे तुला, मनातला भाव माझ्या खुळा,

किती मनाला संभाळा, एेकत नाही आता काही

काय करायचे बरं,

झाला आहे तो खुळा...


किती गोड तू दिसतोस,

अगदी चंद्रासारखा हसतोस,

रातराणी आणि पहाटे माझ्या मनात तू असतोस...

अरे किती छान मला वाटते जेव्हा 

तू जवळ माझ्या असतोस,

हळूच तुझी नजर वर करून माझ्याकडे पाहतोस...


तू आहेस म्हणून

जीवनातला आनंद आहे... सर्वच आहे

हसणं, रडणे दोन्ही अगदी सोबत आहेत

पण,

तू नाहीस तर जीवनाचा काही अर्थ नाही, 

जगण्याचे काही मूल्य नाही, 

हसण्या रडण्याचे कसलेच काही कारण नाही...


हेच सांगायचे आहे तुला... मनातला भाव माझ्या खुळा,

हे वेड्या मना... झालं आहे खुळा,

एेकत नाही मला...


सांग ना आता कसे याला सांगावे,

कसे याला समजावे,

तुझाच विचार करतो सारखं कसे याला सावरावे...


हेच तर सांगायचे आहे तुला,

कळत नाही काय झाले माझ्या वेड्या मना...

वाटते मला झाला आहे तो खुळा,

जीव जडला आहे तुझ्यावर... तुझ्या त्या मनावर,

हेच मला सांगायचे आहे तुला...

कसे सांगावे कळेना माझ्या या वेड्या मना...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance