STORYMIRROR

Renu Pillay

Tragedy

4  

Renu Pillay

Tragedy

वृद्धाश्रम

वृद्धाश्रम

1 min
351

तुमचे मन अगदी दगडाचे ठरायचे..

मुलांनो काय हे तुमचे वागणे म्हणायचे..!

स्वतःलाही लाज वाटेल असे तुमचे वागणे स्वार्थाचे..

आई-वडील म्हातारे झाले की वृद्धाश्रमात टाकायचे..?

हे काय बरे मुलांचे वागणे म्हणायचे।


ज्या आई-वडिलांनी कष्टाचे चीज करून...

तुम्हाला लहानाचे मोठे केले..

स्वतःच्या जीवाचे रान करून तुम्हाला खायला घातले...

तुम्ही चांगले कपडे घालावेत म्हणून स्वतः फाटके वस्त्र घालून...

तुम्हाला मात्र नवीन वस्त्र घेतले..

एवढे प्रेमळ आई वडील तुम्हाला भेटले।


ज्यांचा आयुष्यात आई वडिलांचे सुख नाही..

त्यांनी मात्र डोळे मिटून अश्रू गिळायचे..

तुमच्या आयुष्यात असून तुम्हाला किंमतच नाही म्हणायचे..

अरे देवा !! ह्यला काय वागणे म्हणायचे..?!

आई वडील म्हातारे झाले की वृद्धाश्रमात टाकायचे

हे काय बरे वागणे म्हणायचे।


तुमच्यासाठी अजून त्यांनी किती सोसायचे,

पण तुम्ही मात्र त्यांची काही किंमतच नाही मानायचे.

अरे तुम्हीच असा वागलात तर त्यांनी कुठे म्हणून पाहायचे?

तुमच्याच प्रेमाच्या आशेवर ते जिवंत आहेत..

तुम्हीच असे वागलात तर त्यांनी कसे जगायचे..?


तुम्ही आनंदी आहे ह्यातच त्यांनी आपले सुख मानायचे

पण तुम्ही मात्र त्यांचा डोळ्यात अश्रू आणून त्यांना नुसते दुःखच द्यायचे।।


अरे मुलांनो काय बरे तुमचे हे वागणे म्हणायचे,

आई वडील म्हातारे झाले की त्यांना वृद्धाश्रमात टाकायचे..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy