Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

renu pillay

Tragedy

4.2  

renu pillay

Tragedy

आठवण

आठवण

1 min
189


क्षणात काही क्षण बनतात,

मनात ते आपल्या एक जागा कोरतात

डोळ्यांसमोर आले की डोळे ज्यांनी भरतात

मनात आपल्या आले की मनाला देखील बेचैन करतात

आठवण ती आठवण त्यालाच तर म्हणतात


निसर्गातही लपलेली असते काहीशी आठवण

डोळ्यासमोर येऊ लागते प्रत्येक घडलेले क्षण

ज्यांनी भावुक होऊन जाते आपले मन


पावसाच्या ओल्या थेंबात आठवते आपले घालवलेले लहानपण

डोळेही ओले होऊन जाते जसे आठवते आपले बालपण 

छोट्याशा छत्रीमध्ये सगळे मित्र मावायचे... दंगा घालून अगदी चिखलात खेळायचे

घरी गेल्यावर मात्र आई जाम ओरडायची,

तेव्हा काय ओरडणे म्हणजे पण मस्तीच वाटायची,

कितीही ओरडा खाल्ला तरी बालपणी मात्र खूप मजा असायची

आठवण ती आठवण

आठवणच म्हणायची


जागेवरही कोरलेली असते आठवण...

भांबावून टाकते आपले हळवे असे मन 

डोळ्यांसमोर येते प्रत्येक क्षण,

शाळेतल्या बाकापासून ते कॉलेजच्या कट्ट्यापर्यंत,

गोळावाल्यापासून ते कॅन्टीनच्या काकापर्यंत,

आठवतो आपला तो प्रवास शाळेपासून ते कॉलेजपर्यंत


आठवते प्रत्येक क्षण लहानपणी रडल्यापासून ते सासरी जाताना आलेल्या अश्रूपर्यंत

बाबांच्या आपल्यासोबत खेळण्यापासून ते सासरी जाताना मागच्या अंगणात जाऊन बाबांचे नकळत रडण्यापर्यंत

 

मऊ घास तो भाताचा आईच्या हाताचा 

ऐकू येतो गं आई आवाज तुझ्या हृदयाचा।।


आठवते आई तुझ्यासोबत घालवलेले क्षण तुझे मोहरले स्पर्श

तुझ्या छायेत राहिलेली प्रत्येक आठवण


आठवण ती डोळ्यात साठते काळजात ती अलगद कोरते

डोळे मिटले तर जी आठवते खूप सारी ती आठवण असते...


आठवण ती प्रेमात विरघळते,

आली तर डोळे पानावते आणि चेहऱ्यावर 

एक हसू असते

आठवण ही आठवण अशीच तर असते


Rate this content
Log in