STORYMIRROR

Renu Pillay

Tragedy

3  

Renu Pillay

Tragedy

काय दोष तिचा??

काय दोष तिचा??

1 min
284

तिने काय वाईट केलं होतं तुमचं

इतके गल्लीछ वागलात तिच्याशी

काय चुकलेले तिचं??

मुलगी आहे हे चुकलं,

का माणूस म्हणून ह्या धरती माते वर जन्म घेतला हे चुकलं.

तिला तरी काय माहीत ओ की ह्या धरतीच्या पोटी तुमच्यासारखे घाण किडे पण जन्माला येतात,

जे किडे धरती माते चा पण मान ठेवत नाही,

ते स्त्री चा तरी कसा मान ठेवणार.


ते विसरून गेले की त्यांनी जीच्या पोटी जन्म घेतला ती पण एक स्त्रीच आहे,

त्या स्त्रीला पण आज लाज वाटली असावी की मी कुठल्या राक्षसाला जन्म दिला,

कुठल्या राक्षसाला लहानाचे मोठे केले...

जो मुलगा परक्या स्त्री चा मान ठेवत नाही...

तो आपल्या आईचा तरी कसला मान ठेवणार आहे.

ठेवत असला तर त्याला 

इतके कळत नाही का

ती परकी स्त्री ही कोणाची तरी आई,मुलगी,ताई असेल

इतके समजत नाही का ह्या मुलांना...ह्या बोलत्या जनावरांना.

काय दोष असतो तिचा ?


हा दोष आहे का ती आपल्या घरासाठी,

आपल्या कुटुंबासाठी चार पैसे कमावते,

स्वतःच्या स्वाभिमनासाठी जडते,

स्वतःच्या हिमतीवर,स्वतःचं घर घेते,

आपल्या कुटुंबाला जपते,

किंवा हा दोष आहे का ती शिकते,

तुमच्या पुढे जाते,यश मिळवते,

तुमच्या पेक्षा पण जास्त कमावते की,

हा दोष आहे ती घरच्या बाहेर पडते.

तुमच्यासाखे किडे आहेत म्हणून ती

कधी कधी बाहेर पडायला पण घाबरते.


पण आता ती प्रत्येक स्त्री लढणार, आपल्या स्वतःसाठी लढणार त्या प्रत्येक स्त्री साठी लढणार..

काली माँ चे रूप आहे ती 

ते रूप आता ती धारण करणार आणि त्या प्रत्येक किड्याला त्याची जागा दाखवणार व त्याचा नाश करेन 


ती लढेले...तिच्या काही दोष नाही ती लढेल...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy