आस तुझ्या प्रितीची
आस तुझ्या प्रितीची


मला आस लागली तुझ्या भेटीची,
मला आस लागली तुझ्या गोड नजरेची,
मला आस लागली तुझ्या हृदयाची,
तुझ्या त्या सुंदर मनाची,
तुझ्या त्या सुंदर डोळ्यांची.
सांग ना भेटशील कधी तू पून्हा,
आस लागली वेड्या मना
तुझ्या हसण्याची...तुझ्या गोड अश्या लाजण्याची,
तुझ्या मऊ हाताच्या स्पर्शाची,
तुझ्या लखलखत्या बघण्याऱ्या नजरेची,
मला आस लागले तुझ्या प्रितीची,
तुझ्या मोहरलेल्या सुंदरतेची.
सांग ना...होशील का माझी पुन्हा,
आस लागली वेड्या मना।।
आयुष्यभर सोबती राहून...एक होऊन जाऊ
जवळ येऊन पुन्हा..एक स्वप्न आपण पाहू।।
सांग ना होशील का माझी पुन्हा
आस लागली वेड्या मना।।