मायाजाळ नासे या नामें करुनि ।
मायाजाळ नासे या नामें करुनि ।
मायाजाळ नासे या नामें करुनि ।
प्रिती चक्रपाणि असो द्यावी ॥१॥
असो द्यावी प्रिती साधूचे पायंशी ।
कदा किर्तनासी सोडू नये ॥२॥
सोडू नये पुराणश्रवण किर्तन ।
मनन निदिध्यास साक्षात्कार ॥३॥
साक्षात्कार झालिया सहज समाधी ।
तुका म्हणे उपाधी गेली त्याची ॥४॥
