STORYMIRROR

Sant Tukaram

Classics

2  

Sant Tukaram

Classics

दोष हे जातील

दोष हे जातील

1 min
15.6K


दोष हे जातील अनंत जन्‍मीचे ।

पाय त्‍या देवाचे न सोडावे ॥१॥


न सोडावे पाय निश्‍चय तो करा ।

आळवा शारंगधरा भावबळे ॥२॥


धरुनि केशव आणा भावबळे ।

पापियां न कळे काहि केल्‍या ॥३॥


न कळे तो देव संत संगावाचुणी ।

वासना जाळोनि शुध्‍द करा ॥४॥


शुध्‍द करा मन देहातित व्‍हावे ।

वस्‍तुती ओळखावें तुका म्‍हणे ॥५॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics