गेली त्याची जाण
गेली त्याची जाण


गेली त्याची जाण ब्रह्म तोचि झाला ।
अंतरी निवाला पूर्णपणे ॥१॥
पूर्णपेणे झाला राहतो कैशा रीती ।
त्याचि स्थिती सांगतो मी ॥२॥
सांगतो मी तुम्हा ऐका मनोगत ।
राहतो मूर्खवत जगामाजी ॥३॥
जगात पिशाश्च अंतरी शहाणा ।
सदाब्रह्मी जाणा निमग्न तो ॥४॥
निमग्न तो सदा जैसा मकरंद ।
अंतर्बाहय भेद वेगळाले ॥५॥
वेगळाले भेद किर्ती त्या असती ।
ह्र्यदगत त्याची गति न कळे कवणाला ॥६॥
न कळे कवणाला त्याचे हेचि वर्म ।
योगी जाणे वर्म खुण त्याची ॥७॥
खुण त्याची जाणे जे तैसे असती ।
तुका म्हणे भ्रांती दुजीयाला ॥८॥