STORYMIRROR

Sant Tukaram

Classics

2  

Sant Tukaram

Classics

सत्य सत्य जाणा त्रिवाचा नेम

सत्य सत्य जाणा त्रिवाचा नेम

1 min
14.4K


सत्य सत्य जाणा त्रिवाचा नेम हा । अनुभव पहा पदोपदी ॥१॥


पदोपदी पहा श्रीमुख चांगलं । प्रत्यक्ष पाऊली विठोबाची ॥२॥


विठोबाचे भेंटी हरेल बा चिंता । तुम्हालागी आता सांगितले ॥३॥


सांगितले खरे विश्वाचिया हीता । अभंग वाचिता जे का नर ॥४॥


ते नर पठणी जीवनमुक्त झाले । पुन्हा नाही आले संसारासी ॥५॥


संसार उडाला संदेह फिटला । पूर्ण तोचि झाला तुका म्हणे ॥६॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics