STORYMIRROR

Sant Tukaram

Classics

2  

Sant Tukaram

Classics

दुकजियाला भ्रांति भाविकाला

दुकजियाला भ्रांति भाविकाला

1 min
13.8K


दुकजियाला भ्रांति भाविकाला शांति । साधुची ती वृत्‍ती लिन झाली ॥१॥


लीन झाली वृत्‍ती ब्रह्माते मिळाले । जळांत आटले लवण जैसे ॥२॥


लवण जैसे पुन्‍हा जळाचे बाहेरी । येत नाही खरे त्‍यातुनिया ॥३॥


त्‍या सारिखे तुम्‍ही जाणा साधुवृत्‍ती । पुन्‍हा न मिळती मायाजाळी ॥४॥


मायाजाळ त्‍यांना पुन्‍हा रे बाधेना । सत्‍य सत्‍य जाणा तुका म्हणे ॥५॥



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics