ओळखारे वस्तु सांडारे कल्पना
ओळखारे वस्तु सांडारे कल्पना
ओळखारे वस्तू सांडारे कल्पना ।
नका आडराना जावूं झणी ॥१॥
झणी जाल कोठे बुडवाल हीत ।
विचारी मनांत आपुलिया ॥२॥
आपुलिया जीवे शिवासी पहावे ।
आत्मसुख घ्यावे वेळोवेळा ॥३॥
घ्यावे आत्मसुख स्वरुपी मिळावे ।
भूती लीन व्हावे तुका म्हणे ॥४॥