भूती जीन व्हावे
भूती जीन व्हावे
भूती जीन व्हावे सांगावे न लगेचि ।
आता अहंकाराची शांती करा ॥१॥
शांती करा तुम्ही ममता नसावी ।
अंतरी वसावी भूतदया ॥२॥
भूतदया ठेवा मग काय उणे ।
प्रथम साधन हेचि असे ॥३॥
असो हे साधन ज्यांचे चित्ती वसे ।
मायाजाळ नासे तुका म्हणे ॥४॥